विशेष बातम्या

नवीन जल अमृत योजनेत पटेल कॉलनीत समाविष्ट करण्यासाठी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वात पटेल कॉलनीचे ठिय्या आंदोलन

Patel Colonys sit in protest led by the Injustice


By nisha patil - 10/30/2025 4:19:36 PM
Share This News:



नवीन जल अमृत योजनेत पटेल कॉलनीत समाविष्ट करण्यासाठी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वात पटेल कॉलनीचे ठिय्या आंदोलन
   

लेखी हमीनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

आजरा (हसन तकीलदार)*:-घरफाळा, दिवाबत्ती कर आजरा नगरपंचायतीला, निवडणुकीत मतदान नगरपंचयतीला पाणी पुरवठा मात्र बुरुडे ग्रामपंचायतिकडून अशी अवस्था पटेल कॉलनीचा रहिवाशीयांची झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्षित झाले आहे यासाठी पटेल कॉलनीच्या राहिवाशीयांनी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली नवीन जल योजनेत समविष्ट करून घेण्याबाबतचे निवेदन देत ठिय्या आंदोलन केले. नगरपंचायत प्रशासनाच्या लेखी हमीनंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. जर याबाबत लवकर निर्णय झाला नाही तर पटेल कॉलनीतील सर्व रहिवाशी येथून पुढे कोणतेही कर भरणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
       

गेल्या आठ महिन्यांपूर्वी बुरूडे ग्रामपंचायतीकडून पटेल कॉलनीकडे येणाऱ्या  पाण्याची मुख्य वाहिनी गटर बांधकामाचे काम चालू असताना फुटले मुळे  पटेल कॉलनीतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. त्या वेळी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या पुढाकाराने संबंधित ठेकेदारामार्फत चांगल्या प्रतीची नवीन पाईपलाइन टाकून संपूर्ण लाईनचे पुनर्निर्माण करण्यात आले.
 

तसेच समितीच्या प्रतिनिधींनी बुरूडे ग्रामपंचायतिच्या सरपंच सौ. गुरव मॅडम यांना विनंती केली की, आजरा नगरपंचातिकडून सुरू असलेली नवीन पाणीपुरवठा योजना  पूर्ण होऊन पटेल कॉलनीपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत तात्पुरता  पाणीपुरवठा आपले कडून सुरू ठेवावा.तथापि, आजरा नगरपंचायत क्षेत्रातील पाईपलाइन टाकण्याचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले असले तरीही पटेल कॉलनीपर्यंत मुख्य पाईप लाईन अद्याप जोडण्यात आलेली नाही. या परिस्थितीमुळे पटेल कॉलनीतील नागरिकांना पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष  परशुराम बामणे (भाऊजी) यांच्या नेतृत्वाखाली समितीचे पदाधिकारी व पटेल कॉलनीतील रहिवासी यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, लेखी हमीपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले की, “आजपर्यंत पाणीपट्टी नगरपंचायत आजरा येथून वसूल केली जाते; मात्र प्रत्यक्ष पाणीपुरवठा बुरुडे ग्रामपंचायतमार्फत केला जातो. त्याचप्रमाणे इतर मूलभूत सुविधाही आजरा नगर पंचायत देत नाही त्यामुळे हा बुरुडे ग्रामपंचायत व पटेल कॉलनीतील रहिवाशांवर होणारा स्पष्ट अन्याय आहे.”
 

यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी  कदम मॅडम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पटेल कॉलनीस त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत लेखी हमी दिली. त्यानंतर समितीचे पदाधिकारी व रहिवासी यांनी आपले ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेतले सदर अंदोलनाच्या वेळी परशुराम बामणे (भाऊजी),  दिनकर जाधव,जावेदभाई पठाण,जोतिबा आजगेकर,गौरव देशपांडे, मिनीन डिसोझा,नावेद पटेल, इम्रान पटेल, आक्रम नेसरीकर, खलील मुजावर, जबीउल्ला अडकूरे, अब्दुलजीज लष्करे, रेहान पटेल, असिफ मुजावर, नाजीम माणगावकर, जावेद वाडीकर, आत्ताउल्ला चांद तसेच काँलनीतील इतर रहिवासी उपस्थित होते.


नवीन जल अमृत योजनेत पटेल कॉलनीत समाविष्ट करण्यासाठी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वात पटेल कॉलनीचे ठिय्या आंदोलन
Total Views: 261