बातम्या

प्रभाग क्र. १५ मध्ये पथदिवे बसावा-सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे निवेदन*

Pathdive basava


By nisha patil - 1/7/2026 1:54:47 PM
Share This News:



**प्रभाग क्र. १५ मध्ये पथदिवे बसावा-सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे निवेदन*

*आजरा(हसन तकीलदार)-: सामाजिक सेवा प्रतिष्ठान, आजरा प्रणीत अन्याय निवारण समितीच्या वतीने आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मधील चराटी कॉलनी, आपटे कॉलनी, आनंदवन कॉलनी, रवळनाथ कॉलनी व आयडियल कॉलनी येथे पथ दिवे बसविण्याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी व महावितरणचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,संबंधित भागात रस्त्यावर दिव्यांची सोय नसल्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत असून, चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने पथ दिवे बसविण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी नगरपंचायतीचे सूरज सुर्वे यांनी निवेदनातील मागणी करण्यात आलेल्या ठिकाणांना प्राधान्य देऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच महावितरणचे उपअभियंता यांनी नगरपंचायतीकडून आवश्यक अतिरिक्त वीजभाराची मागणी प्राप्त होताच आवश्यक अंदाजपत्रक तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

या चर्चेस परशुराम बामणे(नगरसेवक), डॉ. सौ. स्मिता कुंभार (नगरसेविका), बाळ केसरकर, किरण कांबळे, पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, जावेदभाई पठाण, संतोष बांदिवडेकर, संजय जोशी आदिजण उपस्थित होते.


प्रभाग क्र. १५ मध्ये पथदिवे बसावा-सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे निवेदन*
Total Views: 16