बातम्या
पट्टणकडोली येथील बिरदेव यात्रेसाठी महावितरण सज्ज
By nisha patil - 9/10/2025 11:19:39 PM
Share This News:
पट्टणकडोली येथील बिरदेव यात्रेसाठी महावितरण सज्ज
पट्टणकडोली : येथील विठ्ठल बिरदेव यात्रा १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान पार पडणार असून, मुख्य दिवस १२ ऑक्टोबर रोजी सुमारे ७ ते ८ लाख भाविकांच्या उपस्थितीची शक्यता आहे. यात्रेदरम्यान अखंड व सुरक्षित विजपुरवठा राहावा यासाठी महावितरणकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
उपकेंद्रात आयोजित आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी यात्रेसाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर, ऑइल, साहित्य आणि मनुष्यबळाची व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती दिली. विजेच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक त्या सूचना देत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देशही देण्यात आले.
पट्टणकडोली येथील बिरदेव यात्रेसाठी महावितरण सज्ज
|