बातम्या
तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांकडून पावनखिंड स्वच्छता मोहिम
By nisha patil - 6/30/2025 5:35:23 PM
Share This News:
तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांकडून पावनखिंड स्वच्छता मोहिम
पावनखिंड, : तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पावनखिंड परिसरात भव्य स्वच्छता मोहिम राबवून ऐतिहासिक रणभूमीस अनोख्या प्रकारे अभिवादन केले.
बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक, रॅपर्स, बाटल्या यांसारखा कचरा संकलित करत "इतिहास जपा, परिसर स्वच्छ ठेवा" हा संदेश कृतीतून दिला. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि वातावरणात शौर्य व स्वाभिमान जागवला.
या उपक्रमात शिवकन्या ट्रेकर्स (तामगाव), रणरागिणी ट्रेकर्स (उजळाईवाडी), शिवगर्जना ट्रेकर्स (तामगाव), शिवबाचे मावळे ट्रेकर्स (उजळाईवाडी) या ग्रुप्सनी सहभाग घेतला. प्राथमिक उपचारांची जबाबदारी कु. अपूर्वा सावंत हिने पार पाडली.
इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. स्नेहल राजेंद्र चोरगे व श्री. राजेंद्र चोरगे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासप्रेम, शिस्त व सामाजिक बांधिलकीबाबत मार्गदर्शन केले. पर्यटक व स्थानिकांनी या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले.
तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांकडून पावनखिंड स्वच्छता मोहिम
|