विशेष बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस मार्ग मोकळा
By nisha patil - 4/8/2025 4:15:46 PM
Share This News:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस मार्ग मोकळा
सुप्रीम कोर्टाकडून नव्या प्रभाग रचना व २७% ओबीसी आरक्षणाला मंजुरी
नवी दिल्ली : राज्यातील महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या आयोजनास अखेर सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. नव्या प्रभाग रचनेसह २७ टक्के ओबीसी आरक्षणाची परवानगी देत, यास विरोध करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावण्यात आल्या. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
यापूर्वी प्रभाग रचनेवरून महायुती, महाविकास आघाडी आणि नंतरच्या सरकारने वेळोवेळी फेरबदल केले होते. त्यावरून प्रभाग रचना वैध आहे की नाही, यावर न्यायालयात वाद निर्माण झाला होता. मात्र आजच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, नवीन प्रभाग रचनेनुसार आणि पूर्वीप्रमाणेच २७% ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यात याव्यात.
सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट सूचना
कोर्टाने याआधीच निवडणूक आयोगाला ४ आठवड्यांत अधिसूचना जारी करून ४ महिन्यांत निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग निवडणुका लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने यावेळी स्पष्ट शब्दांत फटकारले.
राजकीय दबाव, आरक्षणाचा मुद्दा आणि प्रभाग रचना यामुळे रखडलेल्या निवडणुकांचा अडथळा आता दूर झाल्यामुळे राज्यभरात लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस मार्ग मोकळा
|