बातम्या
पवारांचे मनोमिलन! चंदगडमध्ये भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
By nisha patil - 12/11/2025 5:11:20 PM
Share This News:
पवारांचे मनोमिलन! चंदगडमध्ये भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आता पुन्हा एकत्र आल्या आहेत. चंदगड नगरपरिषदेत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही गटांना एकत्र आणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘राजर्षी शाहू आघाडी’ची घोषणा केली.
या युतीचं लोण आता फक्त कोल्हापुरापुरतं मर्यादित न राहता बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे दोन्ही पवारांचं ‘राजकीय पुनर्मिलन’ आगामी निवडणुकांत भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं दिसतायत.
पवारांचे मनोमिलन! चंदगडमध्ये भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
|