बातम्या
देयके थकित, विकासकामे ठप्प; राज्यभर कंत्राटदारांचे धरणे आंदोलन
By nisha patil - 8/19/2025 6:49:30 PM
Share This News:
देयके थकित, विकासकामे ठप्प; राज्यभर कंत्राटदारांचे धरणे आंदोलन
३५ जिल्ह्यांत एकाचवेळी आंदोलन; शासनाविरोधात कंत्राटदार संघटना आक्रमक
गेल्या आठ महिन्यांपासून विविध शासकीय विभागांची कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांना देयके न मिळाल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. निधीअभावी विकासकामे ठप्प झाली असून, शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना आणि जिल्हा संघटनेने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे कंत्राटदारांचे लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, हॉट मिक्स असोसिएशन व मजूर सहकारी फेडरेशन यांसह विविध संघटनांचा पाठींबा आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. भिमाले, किशोर जामदार, दिलीप पाटील, संदीप सावंत, प्रदीप पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास कंत्राटदारांबरोबर लाखो मजुर व पुरवठादार उपासमारीच्या संकटात सापडतील.
देयके थकित, विकासकामे ठप्प; राज्यभर कंत्राटदारांचे धरणे आंदोलन
|