ताज्या बातम्या

सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता कमिटी बैठक संपन्न

Peace Committee meeting held by Sangli District Police Force


By nisha patil - 9/10/2025 12:47:05 PM
Share This News:



सांगली : सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व राजकीय, धार्मिक व सामाजिक शांतता कमिटीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सर्व उपस्थित नागरिक, समाजप्रतिनिधी आणि कमिटी सदस्यांशी संवाद साधत सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश दिला.

पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले की, "कोणत्याही प्रकारच्या अफवा, भडकाऊ किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, कमेंट किंवा शेअरवर विश्वास ठेवू नका आणि अशा गोष्टींना पुढे पसरवू नका."

तसेच, सोशल मीडियाच्या जबाबदारीने वापराचे महत्त्व अधोरेखित करत, शांती, एकता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला विविध धर्मीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते


सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता कमिटी बैठक संपन्न
Total Views: 79