विशेष बातम्या
प्रलंबित ई-चलनावर 50% भरून दंडमुक्ती योजना महाराष्ट्रात लागू होणार!
By nisha patil - 10/12/2025 4:32:10 PM
Share This News:
प्रलंबित ई-चलनावर 50% भरून दंडमुक्ती योजना महाराष्ट्रात लागू होणार!
FASTag मधून दंडाची स्वयंचलित वसूली?—मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
विधानभवनातील चर्चेदरम्यान राज्यात तब्बल सुमारे 5000 कोटी प्रलंबित ई-चलन दंड असल्याची बाब समोर आली. दिल्लीसारखे ‘50% भरून दंड मिटवा’ हे मॉडेल महाराष्ट्रातही एक महिन्यांच्या विशेष सवलत योजनेंतर्गत राबवावे, अशी महत्त्वाची सूचना करण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात थकित रक्कम वसूल होऊन राज्याच्या तिजोरीत तातडीने महसूल भरणार असल्याचे मत व्यक्त झाले.
भविष्यात वाहतूक दंडाची FASTag मधून स्वयंचलित वसूली करण्याची शक्यता तपासण्याचीही सूचना देण्यात आली. यावर प्रतिसाद देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवलत योजना लागू करण्याचे आश्वासन दिले तसेच FASTag प्रणालीवर सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले.
प्रलंबित ई-चलनावर 50% भरून दंडमुक्ती योजना महाराष्ट्रात लागू होणार!
|