बातम्या
दिव्यांगाना समानतेची वागणूक मिळावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 1/12/2025 6:02:36 PM
Share This News:
दिव्यांगाना समानतेची वागणूक मिळावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर दि : 1 दिव्यांग बांधव हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकाला परावलंबित्वाची जाणीव होऊ नये यासाठी सर्व शासकीय विभागांनी दक्ष रहावे, त्यांना समानतेची वागणूक मिळावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हास्तरीय दिव्यांग हक्क अधिनियम 2016 च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबतच्या त्रैमासिक आढावा बैठकीत ते बोलत होते.दिव्यांगाच्या अनुषंगाने ज्या विभागा कडे अखर्चित निधी असेल अशा विभागांनी तो शंभर टक्के खर्च करावा तसेच खर्च करत असताना त्यामध्ये त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी सूचना करून येत्या सात दिवसांमध्ये संबंधित विभागाने शासकीय जी.आर च्या अनुषंगाने सर्व आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश दिले .
या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग बाधवांच्या अनुषंगाने निधी उपयोगिता, युडीआयडी व आधारकार्ड संलग्नीकरण करणे, आस्थापना विषयक आवश्यक बाबी, विविध सामाजिक योजना तसेच रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र , विमा संरक्षण,घरकुल आदी बाबींचा आढावा घेतला .यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस. मनपा उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती सुवर्ण सावंत , सहा.आयुक्त समाज कल्याण सचिन साळे,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,सहा आयक्त जमीर करीम,पो.नि सुशांत चव्हाण यांच्यासह इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांगाना समानतेची वागणूक मिळावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे
|