बातम्या
पेरणोली प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करणार
By nisha patil - 8/12/2025 3:13:55 PM
Share This News:
पेरणोली प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करणार
आजरा(हसन तकीलदार)*:-गावकरी एकवटले,२४, २५ व २६ जानेवारी २०२६ तीन दिवस साजरा होणार शताब्दी मोहोत्सव.
१९२५ साली सुरू झालेल्या पेरणोली केंद्रशाळेला यावर्षी शंभर पूर्ण होत असून यानिमित्ताने पेरणोली केंद्रशाळेचा शताब्दी महोत्सव लोकोत्सवच्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.दि २४,२५ व २६ जानेवारी तीन दिवस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
पेरणोली केंद्रशाळेने गेल्या शंभर वर्षात पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरिवडे, देवकांडगाव या गावातील अनेक विद्यार्थी घडवले. अनेक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकारांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी शाळेचे नाव उंचावले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या साऱ्यांचा धोंडाळा घेण्यात येणार आहे.
याबरोबरच अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. येणाऱ्या पाच वर्षांचा आराखडा बनवून त्याआधारे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक व्यापक समिती बनवली असून वेगवेगळ्या उपसमित्याही बनवल्या आहेत. समन्वयक म्हणून उदय कोडक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बैठकिला उदय पवार(साखर कारखाना संचालक), कॉ.संपत देसाई, तानाजी देसाई(स्वाभिमानी शेतकरी संघटना), पांडुरंग लोंढे, राजेंद्र सावंत, उदय कोडक, मारुती वरेकर,इनांस फर्नांडिस, वंदन जाधव, कृष्णा सावंत(पत्रकार), काका देसाई, आदेश गुरव, अविनाश वर्धन, अविनाश जोशीलकर, संतोष येरुडकर, सुरेश कालेकर,संजय मोहिते, पांडुरंग दोरुगडे, सचिन देसाई, संकेत सावंत, दीपक देसाई, विठ्ठल मस्कर, सुभाष देसाई, अमित सावंत, रणजित फगरे, रणजित कालेकर(पत्रकार), व्ही.डी.जाधव, अरुण जाधव यांच्यासह ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
पेरणोली प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करणार
|