बातम्या
पेठ वडगांव पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा जप्त
By nisha patil - 8/21/2025 3:03:37 PM
Share This News:
पेठ वडगांव पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा जप्त
(प्रतिनिधी किशोर जासूद) पेठ वडगाव: तब्बल 62,45,360 रुपयांच्या गुटख्या सह 15,00,000 रुपयांच्या ट्रक सहित असा एकूण 77,45,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडगांव पोलिसांची गेल्या दोन महिन्यात तिसरी सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की 19 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01:41 च्या सुमार किणी टोल नाका येथे बंगलोर ते पुणे हायवे रोड वरून ट्रक क्रमांक MH 03 CV 3017 हा ट्रक बेंलोर दिशेने येत होता तरी ट्रक थांबवून चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल मिळाला, तसेच चालक व त्याचा सोबती यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक कोल्हापूर , अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर व पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.गुन्ह्याचा अधिक तपास पो स ई माधव डिगोळे हे करीत आहेत
पेठ वडगांव पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा जप्त
|