बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये फिजिक्स इन्स्पायर क्लबचे उद्घाटन

Physics Inspire Club inaugurated at Vivekananda College


By nisha patil - 3/10/2025 3:42:36 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये फिजिक्स इन्स्पायर क्लबचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रवासाला नवे पंख, नवी दिशा

कोल्हापूर दि. 3: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या भौतिकशास्त्र विभागात फिजिक्स इन्स्पायर क्लब (PIC) चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक उपक्रम, संशोधनाची प्रेरणा आणि सर्जनशीलतेला चालना मिळणार असून, विज्ञानाची आवड अधिक जोपासली जाणार आहे. उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी जिज्ञासा निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या क्लबचे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, नेतृत्वगुणांचा विकास घडवणे आणि संशोधनाची आवड वाढवणे, गेस्ट लेक्चर्स, कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा आणि नवकल्पनांना वाव देणारे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विज्ञान चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हे क्लबचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांनी सांगितले.

फॅकल्टी को-ऑर्डिनेटर्स म्हणून डॉ. जी. जे. नवाथे, डॉ. एस. आय. इनामदार, प्रा. अविनाश आर. गायकवाड, प्रा. अनुरथ गोरे, प्रा. प्रज्ञा पाटील आणि प्रा. मयुरी बराळे हे कार्य पाहणार आहेत. तर विद्यार्थी समितीत अध्यक्षपदी कु. तेजस्विनी बनसोडे, उपाध्यक्ष आदिती कुंभार, सचिव ऋषी डोंगरे, संयुक्त सचिव ऋषिकेश राऊत, कोषाध्यक्ष सुदर्शन खुटाळे तसेच १० हून अधिक इव्हेंट को- ऑर्डिनेटर्सचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्राध्यापक व उपप्राचार्यांनी विद्यार्थी समितीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी विभागातील प्राध्यापकांसह श्री. गणेश माने, श्री. प्रशांत पाटील आणि श्री. पुंडलिक हरेर यांनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ श्री. कौस्तुभ गावडे आणि प्रबंधक श्री. सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 


विवेकानंद कॉलेजमध्ये फिजिक्स इन्स्पायर क्लबचे उद्घाटन
Total Views: 109