बातम्या

पिंक ई-रिक्षा’मधून महिलांचे आर्थिक स्वावलंबन होणार 

Pink e rickshaw will make women financially independent


By Administrator - 8/8/2025 4:36:22 PM
Share This News:



पिंक ई-रिक्षा’मधून महिलांचे आर्थिक स्वावलंबन होणार 

१०,००० महिलांसाठी नवा प्रवास : महाराष्ट्र सरकार व कायनेटिक ग्रीनचा उपक्रम

महाराष्ट्र सरकार आणि कायनेटिक ग्रीन यांच्या संयुक्त विद्यमाने १०,००० महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा’ उपक्रम सुरू झाला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूरसह ८ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात असून, महिलांना २०% सरकारी अनुदान, १०% डाउन पेमेंट व उर्वरित ७०% कर्ज स्वरूपात दिले जाणार आहे.

सुलज्‍जा फिरोदिया : 'पिंक ई-रिक्षा' ही आशा आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक प्रकल्पाअंतर्गत महिलांना मोफत प्रशिक्षण, ड्रायव्हिंग लायसन्स, चार्जिंग सुविधा, ५ वर्षांची वॉरंटी, आणि दर तिमाहीत एक मोफत सर्व्हिससह देखभाल करार दिला जाणार आहे. यामध्ये घटस्फोटित, विधवा आणि गरीब महिलांना प्राधान्य दिले जाणार असून, प्रकल्प महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबत हरित पर्यावरणालाही चालना देईल.


पिंक ई-रिक्षा’मधून महिलांचे आर्थिक स्वावलंबन होणार 
Total Views: 45