शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात मत्सालय व्यवस्थापन व बांधकामवर अग्रणी कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 3/11/2025 12:13:19 PM
Share This News:
कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर (दि न्यू कॉलेज क्लस्टर अंतर्गत) प्राणिशास्त्र विभाग आणि (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने "Aquarium Management and Construction" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा लीड कॉलेज योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी श्री.शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री.मानसिंग बोंद्रे(दादा), व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. पी. आडाव , लायब्रियन – द न्यू कॉलेज, कोल्हापूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. आर. के. शानेदिवाण प्राचार्य – श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांनी भूषविले.
कार्यक्रमात विशेष उपस्थिती डॉ. आर. डी. मांडणीकर (समन्वयक, IQAC), डॉ. ए. बी. बलुगडे (सह-समन्वयक, IQAC), डॉ. पी. बी. पाटील (लीड कॉलेज योजना समन्वयक), श्री. आर. जे. भोसलें (प्रबंधक), श्री. एम. व्ही. भोसलें (कार्यालय अधीक्षक) यांनी दर्शविली.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. ए. एस. कांबळे, प्रमुख – प्राणिशास्त्र विभाग यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. जे. महाले यांनी मानले.
पहिल्या सत्रात डॉ. सागर व्हनाळकर (सह.प्राध्यापक व प्रमुख, प्राणिशास्त्र विभाग, कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी) यांनी “Introduction of Aquarium” या विषयावर व्याख्यान दिले.
दुसऱ्या सत्रात अक्वालाइफ अक्वेरियम, कोल्हापूर येथील श्री. नरेंद्र कुलकर्णी यांनी “Aquarium Construction and Management” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.तिसऱ्या सत्रात त्याच विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले.
दुपारनंतर झालेल्या समारोप सत्रात
कार्यशाळेचा आढावा प्रा. ए. एस. कांबळे यांनी सादर केला. सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. स्वामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. जे. महाले यांनी केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना अक्वेरियम व्यवस्थापन, बांधणी व देखभाल या विषयावरील प्रत्यक्ष ज्ञान मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने करण्यात आले.
शहाजी महाविद्यालयात मत्सालय व्यवस्थापन व बांधकामवर अग्रणी कार्यशाळा संपन्न
|