बातम्या

५ व ६ मार्च रोजी पन्हाळा, गगनबावडा व आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

Placement drives organized at Panhala Gaganbawda and Ajra ITIs on March 5th and 6th


By Administrator - 5/3/2026 12:42:31 PM
Share This News:



५ व ६ मार्च रोजी पन्हाळा, गगनबावडा व आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

कोल्हापूर :- अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पन्हाळा, गगनबावडा, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने अनुक्रमे ५ मार्च रोजी पन्हाळा, ६ मार्च रोजी गगनबावडा व आजरा येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

५ मार्च रोजी आयटीआय पन्हाळा येथे होणाऱ्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये दोन खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून FITTER FABRICATION आणि SELF EMPLOYED TAILOR पदांकरीता ४५ पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. यासाठी अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) प्रशिक्षीत उमेदवार, १० वी, १२ वी, आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

तसेच ६ मार्च रोजी आयटीआय गगनबावडा  येथे होणाऱ्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १ खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून ELECTRICIAN, पदांकरीता २५ पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. यासाठी अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) प्रशिक्षीत उमेदवार आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. व त्याच रोजी आयटीआय आजरा येथे ELECTRICIAN, SELF EMPLOYED TAILOR, या पदांकरीता अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) प्रशिक्षीत उमेदवार, १० वी, १२ वी, आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

 इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युम सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ  घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.


५ व ६ मार्च रोजी पन्हाळा, गगनबावडा व आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
Total Views: 8