विशेष बातम्या

नंदवाळ आषाढी वारीच्या तयारीसाठी नियोजन बैठक १३ जूनला...

Planning meeting for preparations for Nandwal Ashadhi Wari on June 13th


By nisha patil - 6/14/2025 3:07:54 PM
Share This News:



नंदवाळ आषाढी वारीच्या तयारीसाठी नियोजन बैठक १३ जूनला...

 प्रथमच चांदीचा रथ होणार आकर्षणाचा केंद्रबिंदू

कोल्हापूर – पंढरपूरची परंपरा लाभलेल्या नंदवाळ गावात श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे निघणाऱ्या आषाढी वारीच्या नियोजनासाठी १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता कार्यालयाजवळील विठ्ठल मंदिरात विशेष नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या वर्षीच्या वारीत प्रथमच चांदीचा रथ सहभागी होणार असून, ही विशेष आकर्षणाची बाब ठरणार आहे. मुख्य वारी ६ जुलै रोजी निघणार आहे, तर ५ जुलै रोजी नगर प्रदक्षिणा, कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन होणार आहे.

या बैठकीसाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन दिंडी प्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज, एम.पी. पाटील, सखाराम चव्हाण (काडगांव), चोपदार भगवान टिळे, समिती अध्यक्ष बाळासाहेब पोवार, सचिव दीपक गौड, मानद संचालक राजेंद्र किंकर, गंगाधर दास, डॉ. संतोष कुलकर्णी, शिवानी भागले आदींनी केले आहे.

वारीसाठी तन-मनाने सेवा देणारे स्वयंसेवक आणि ग्रामस्थ यंदा नवउत्साहाने सहभागी होत असून, हा सोहळा अध्यात्मिकतेचा, भक्तीचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरणार आहे.


नंदवाळ आषाढी वारीच्या तयारीसाठी नियोजन बैठक १३ जूनला...
Total Views: 96