विशेष बातम्या

जंगलांचे संवर्धन करण्यासाठी देशी प्रजातीची झाडे लावा. सरपंच परिषदेचे वनमंत्र्यांना निवेदन

Plant indigenous species


By nisha patil - 9/17/2025 11:10:40 AM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार):- 30 ते 40 वर्षे आयुर्मान असणाऱ्या आकेशिया, निलगिरी या विदेशी वृक्षांची लागवड महाराष्ट्र शासनाच्या वनविकास महामंडख या विभागातर्फे सन 1090ते 1995या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यात तसेच लागतच्या शेजारील तालुक्याच्या जंगलातून करण्यात आली असलेने जंगलांचेवर विपरीत परिणाम होऊन जंगलांची नैसर्गिक साखळी बिघडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

जंगलात चारा उपलब्ध न झाल्याने वन्यप्रण्यांनी आपला मोर्चा शेतीपिकाकडे वळवला आहे. जमिनीचा पोत बिघडत आहे. यासाठी जंगलामध्ये देशी प्रजातीची झाडे लावून निसर्ग संपन्न करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याने विदेशी झाडे काढून देशी प्रजातीची वृक्ष लागवड करणे बाबत आजरा तहसीलदार यांचेबरोबर वनमंत्री, पालकमंत्री, आमदार यांनाही सरपंच परिषद,मुंबई यांनी निवेदन दिले आहे.
     सन 1990 च्या दशकामध्ये वृक्षाच्छादन वाढवणेच्या उद्देशाने शासनाने वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला होता. यामध्ये आकीशिया,निलगिरी अशा प्रकारच्या विदेशी प्रजातींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. या झाडांच्यामुळे जंगल साधनांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या झाडांच्या पानझडीमूळे त्याखालील जमिनीचा नैसर्गिक पोत बिघडून जमिनी  आम्लयुक्त होत आहेत परिणामी जंगलामध्ये गवत उगवणीवर परिणाम होऊन जमिनीतील जीवजंतूच्या जीवनचक्रावरही परिणाम झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांना पुरेसे अन्न उपलब्ध न झाल्याने या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेत पिकाकडे वळवलेला आहे. यामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे.

या विदेशी प्रजातीच्या वृक्ष लागवडीमुळे जमिनी नापिक होऊन विविध वन्यजिवांच्या अन्नसाखळ्यावर ताण येत आहे. त्याचप्रमाणे या झाडांमध्ये जमिनीतील पाणी शोषून घेण्याची क्षमता तिव्र असल्याने जमिनीतील पाणी साठ्यामध्ये घट होऊन भुजल पातळी खालावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाणी टंचाईसारख्या समस्या उद्भवताना दिसत आहेत.
    यासाठी शासन पातळीवर देशी प्रजातींची म्हणजेच आंबा, फणस, चिंच, वड, शिसम, करंजी, सागवान, सावर यासारख्या देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. तरच वन्य जिवांच्या अन्नसाखळ्या समृद्ध होणार आहेत.
    *गेली तीन ते चार वर्षे सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र)मार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठीचे विविध उपक्रम सक्रियपणे राबवले जात आहेत. देशी प्रजातींची वृक्ष लगवड, वृक्ष रोपे वाटप, वणवा निर्मूलन मोहीम, जनजागृती मेळावे अशा प्रकारच्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचे काम करीत असल्याबद्दल तसेच याचे सकारात्मक बदल होत असलेबाबत सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी सांगितले.
   निवेदनावर राजू पोतनीस, जी. एम. पाटील, सौ.प्रियांका जाधव, पांडुरंग तोरगल्ले, सौ. रत्नप्रभा भुतुर्ले, विलास जोशीलकर, सौ. समीक्षा देसाई, युवराज पाटील, पांडुरंग खवरे, लहू वास्कर, अनिल पाटील, धनाजी दळवी, सौ. वैषाली गुरव, सागर पाटील, मारुती पोवार, पांडुरंग कांबळे आदींच्या सह्या आहेत.


जंगलांचे संवर्धन करण्यासाठी देशी प्रजातीची झाडे लावा. सरपंच परिषदेचे वनमंत्र्यांना निवेदन
Total Views: 68