कृषी
शाहू क्लास मार्केट परिसरात नागरिकांचे हाल – उघडे ड्रेनेज, खड्डे आणि घाणीचे साम्राज्य
By nisha patil - 9/20/2025 11:13:36 AM
Share This News:
कोल्हापूर-: शाहू चित्रमंदिरासमोरील शाहू क्लास मार्केट परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. येथे भंगार बाजार भरत असून पावसाळ्यात नेहमी पाणी साचून चिखल तयार होतो. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
त्यातच आता या परिसरातील अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणं तुटलेली असून नाल्यांचे मोठे खड्डे उघडे पडलेले आहेत. पावसाचे पाणी व चिखल या उघड्या ड्रेनेजमध्ये साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय रस्त्यावर मोठे खड्डे, रस्त्याची दुरावस्था आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे परिसराचे चित्र अधिक भयावह झाले आहे. नागरिक, लहान मुले व वृद्ध व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका आहे.
महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही.
नागरिकांचा प्रश्न असा आहे की – महापालिकेने त्वरित पावले उचलून उघड्या ड्रेनेजला झाकणं बसवावीत, खड्डे बुजवावेत व स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अन्यथा मोठी दुर्घटना घडल्याशिवाय जबाबदार जागे होणार नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शाहू क्लास मार्केट परिसरात नागरिकांचे हाल – उघडे ड्रेनेज, खड्डे आणि घाणीचे साम्राज्य
|