बातम्या

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत वेंगुर्लेत लोककल्याण मेळावा..

Pm svanidhi


By nisha patil - 6/18/2026 10:52:55 PM
Share This News:



पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत वेंगुर्लेत लोककल्याण मेळावा..

सिंधुदुर्ग :✒️शुभम गवस वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सभापती गौरी मराठे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यात लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्यात आली. नगराध्यक्ष राजन गिरप यांनी केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे यांनी कर्ज प्रक्रिया व बँकिंग सुविधांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी पात्र लाभार्थ्यांना क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले तसेच नव्या कर्जासाठी अर्ज स्वीकारण्यात आले. कार्यक्रमास सुमारे ३० लाभार्थी उपस्थित होते.


पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत वेंगुर्लेत लोककल्याण मेळावा..
Total Views: 19