बातम्या
पन्हाळा नगरपरिषदेस २,२५ कोटी रुपये बक्षीस महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर
By nisha patil - 2/21/2026 11:36:00 PM
Share This News:
पन्हाळा नगरपरिषदेस २,२५ कोटी रुपये बक्षीस महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर माझी वसुंधरा अभियान ४.०(सन २०२२-२४) अंतर्गत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेचा १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणा-या नगरपरिषद/नगरपंचायत गटामध्ये महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे.
तसेच माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेचा १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणा-या नगरपरिषद/नगरपंचायत गटामध्ये पुणे विभागस्तरावर प्रथम क्रमांक व महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला.त्यानुषगाने पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेस एकूण प्रोत्साहनपर २,२५ कोटी रुपये बक्षीस अनुदान महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर करणेत आलेले आहे.
माझी वसुंधरा अभियान 4.0 व माझी वसुंधरा अभियान 5.0 मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान सोहळा शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली, मा.ॲड. राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष) मा. सुनेत्रा पवार(उप मुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री) मा. पंकजा मुंडे(मंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल), मा. जयश्री भोज (सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य) व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण हे सकाळी १२ वा. सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेस हा पुरस्कार वितरण पंकजा मुंडे (पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री) व मा. जयश्री भोज (सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) यांच्यामार्फत देण्यात आला.
सदरचा पुरस्कार पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद मार्फत स्वीकारण्यासाठी मुंबई येथे नगराध्यक्षा मा.श्रीमती.जयश्री पवार उपनगराध्यक्ष मा.श्री सतीश भोसले अमितराज पवार, नगरपरिषदेचे कर्मचारी प्रिया तारळे,सुहास करळे,या सर्वांनी मिळून स्वीकारला.
पन्हाळा नगरपरिषदेस २,२५ कोटी रुपये बक्षीस महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर
|