बातम्या
हिंदी अधिविभागात काव्य मैफिल
By nisha patil - 9/25/2025 12:30:43 PM
Share This News:
हिंदी अधिविभागात काव्य मैफिल
कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागाच्या वतीने हिंदी सप्ताहानिमित्त बुधवारी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नवकवींनी मोठ्या संख्येने उत्स्फुर्त सहभाग नोंदविला आणि स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
काव्य संमेलनामध्ये प्राध्यापक, संशोधक, एम.ए.च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील वर्तमान स्थिती, कुटुंबाविषयाच्या भावना, तुटत चाललेले नातेसंबंध, प्रेम अशा वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले. यावेळी सुप्रिया पवार, अविनाश कांबळे, प्रमोद कांबळे, सतीश हरपडे, विक्रम राजवर्धन, गुलामगौस तांबोळी, पूजा दावणे, आराधना कदम आदी २५ कवींनी कवितांचे सादरीकरण केले.
अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रकाश निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयसिंग कांबळे यांनी केले. यावेळी डॉ. संतोष कोळेकर, डॉ. अक्षय भोसले, डॉ. गीता दोडमणी, डॉ. अनिल मकर, डॉ. सुवर्णा गावडे, प्रतीक्षा ठोंबरे व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदी अधिविभागात काव्य मैफिल
|