बातम्या

गडहिंग्लजमध्ये ‘क्रॅक बाब्या गँग’वर पोलिसांची धडक कारवाई!

Police crackdown


By nisha patil - 12/11/2025 5:12:32 PM
Share This News:



गडहिंग्लजमध्ये ‘क्रॅक बाब्या गँग’वर पोलिसांची धडक कारवाई! 
 

१० जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘क्रॅक बाब्या हॅशटॅग ८८ गँग’ या टोळीचा बंदोबस्त केला आहे. म्होरक्या क्रॅक बाब्यासह दहा जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले की, ही टोळी किरकोळ कारणांवरून हल्ले, मारहाण आणि गोंधळ घालत होती. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी या सर्वांवर कारवाईस मंजुरी दिली.

हद्दपार झालेल्यांमध्ये विवेक उर्फ क्रॅक बाब्या घुरे, निखिल उर्फ पोपट दळवी, शरद कोरवी, अक्षय नार्वेकर, सोहम गायकवाड, आदित्य संभाजी, तसेच प्रवीण आणि युवराज संकपाळ, शेखर जाधव यांचा समावेश आहे. यातील काही आरोपी सध्या कारागृहात असून उर्वरितांना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रोहित उर्फ सोन्या तिट्टे याच्यावरही उद्यापर्यंत कारवाई होणार आहे. आणखी एका आठ जणांच्या टोळीवर पोलिसांची नजर आहे.
ही कारवाई उपनिरीक्षक रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


गडहिंग्लजमध्ये ‘क्रॅक बाब्या गँग’वर पोलिसांची धडक कारवाई!
Total Views: 34