बातम्या
महाविद्यालयांसमोर पोलिसांचा धडाका; १३७ जणांकडून २.३२ लाख दंड!
By nisha patil - 11/22/2025 3:30:04 PM
Share This News:
महाविद्यालयांसमोर पोलिसांचा धडाका; १३७ जणांकडून २.३२ लाख दंड!
शाळा आणि महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने धडाकेबाज कारवाई केली. वाहन परवाना नसलेल्या २० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल करण्यात आला,
तर १२ अल्पवयीन चालकांना पालकांच्या उपस्थितीत समज देत कारवाई करण्यात आली.दिवसभरात करण्यात आलेल्या १३७ कारवायांत २ लाख ३२ हजारांचा दंड वसूल झाला. ट्रिपलसीट, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न, बेशिस्त पार्किंग आणि भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवरही कडक कारवाई झाली.
१८ पोलिस अंमलदारांनी महाविद्यालयांसमोर उभे राहून नियमभंग करणाऱ्यांना अडवले आणि वाहतूक शिस्तीसाठी ही मोहीम राबवली.
महाविद्यालयांसमोर पोलिसांचा धडाका; १३७ जणांकडून २.३२ लाख दंड!
|