बातम्या
कोल्हापुरात दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला! सहा जणांना अटक
By nisha patil - 10/28/2026 2:07:48 PM
Share This News:
कोल्हापुरात दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला! सहा जणांना अटक
कोल्हापूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना राजारामपुरी पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत दोन दुचाकींसह कोयता, हॉकी स्टिक, लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, मिरचीपूड, दोरी आणि सात मोबाईल फोन असा सुमारे २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२६ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास आयसोलेशन हॉस्पिटलच्या पाठीमागील मैदानावर काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत जमल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या संशयीतांविरुद्ध यापूर्वी दरोडा, खुनाचा प्रयत्न, चोरी, मारामारी आणि मोटारसायकल चोरीसह विविध प्रकारचे एकूण २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे करीत आहेत.
कोल्हापुरात दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला! सहा जणांना अटक
|