बातम्या
कोल्हापूरात गणेशोत्सवासाठी पोलिसांच्या सूचना
By nisha patil - 12/8/2025 4:34:34 PM
Share This News:
कोल्हापूरात गणेशोत्सवासाठी पोलिसांच्या सूचना
कोल्हापूर: परंपरेनुसार जोशपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असला तरी, यावर्षी उत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा, यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सव मंडळांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी लेसरचा वापर टाळावा, डॉल्बीच्या आवाजाला मर्यादा ठेवावी, मंडप छोटे घालावेत, मंडळ आणि परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, गर्दीचे नियोजन करावे, अशा सूचना केल्या.
शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी आवाजाची मर्यादा पाळणे, लेसरचा वापर न करणे, स्ट्रक्चरचा मोह टाळणे आणि विसर्जन मिरवणुकीत रेंगाळू नये अशा सूचना दिल्या. तसेच इतर मंडळांनाही महाद्वार रोडवर प्रदर्शनाची संधी द्यावी, असेही सांगितले.
बैठकीत मंडळांच्या प्रतिनिधींनी खड्ड्यांसाठी पैसे आकारू नयेत, देखाव्यांना उशीरापर्यंत परवानगी द्यावी आणि विसर्जन मिरवणुकीसाठी लवकर चिठ्ठ्या काढाव्यात, अशा मागण्या केल्या.
कार्यक्रमाला सागर गवळी, अमित पाटील, राकेश तिवले, धर्मेंद्र बोगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी आभार मानले.
कोल्हापूरात गणेशोत्सवासाठी पोलिसांच्या सूचना
|