बातम्या
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक नजर — १०४ गुन्हेगारांची ओळखपरेड
By nisha patil - 10/28/2025 5:08:34 PM
Share This News:
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक नजर — १०४ गुन्हेगारांची ओळखपरेड
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहुपुरी आणि राजारामपुरी या चार पोलीस ठाण्यांतील एकूण १०४ गुन्हेगारांची ओळखपरेड घेण्यात आली.
यावेळी संबंधित गुन्हेगारांना आगामी निवडणुकांदरम्यान शांतता राखण्याबाबत समज देण्यात आली. या कार्यवाहीत चारही पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक नजर — १०४ गुन्हेगारांची ओळखपरेड
|