बातम्या

जयंती नाल्यावर पोलिसांचा सापळा; २० ग्रॅम MD ड्रग्ससह दोघे जेरबंद!

Police lay trap at Jayanti Nala


By nisha patil - 6/10/2026 2:31:11 PM
Share This News:



जयंती नाल्यावर पोलिसांचा सापळा; २० ग्रॅम MD ड्रग्ससह दोघे जेरबंद!

जयंती नाला परिसरात एम.डी. अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. सॅम्युअल दीपक पवार वय २२ आणि आदित्य अनिल कस्तुरे वय २४ अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयंती नाला येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोघांकडून २० ग्रॅम मेफेड्रोन (MD) अंमली पदार्थ, मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नशामुक्त कोल्हापूर जिल्हा मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांची विक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर जयंती नाला परिसरात सापळा रचण्यात आला. दोघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.


जयंती नाल्यावर पोलिसांचा सापळा; २० ग्रॅम MD ड्रग्ससह दोघे जेरबंद!
Total Views: 16