बातम्या
राजारामपुरी गणेश आगमन मिरवणुकीसाठी पोलिसांची बैठक
By nisha patil - 8/21/2025 5:55:27 PM
Share This News:
राजारामपुरी गणेश आगमन मिरवणुकीसाठी पोलिसांची बैठक
कोल्हापूर, दि. २१ : राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील श्री गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीच्या अनुषंगाने आज सकाळी ११ वाजता इंद्रप्रस्थ हॉल, लकी बाजार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अध्यक्षस्थानी होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, तसेच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले की, “कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सवाची सुरुवात राजारामपुरी आगमन मिरवणुकीपासून होते. ही मिरवणूक शांततेत, पारंपरिक वाद्यांच्या गजरात, उत्साहाने पार पडावी. कोणतेही गालबोट लागू नये,” असे आवाहन त्यांनी केले.
मिरवणुकीदरम्यान वादविवाद टाळण्यासाठी सर्व मंडळांना लकी ड्रॉच्या आधारे क्रमांक देण्यात आले आहेत. यावेळी परिसरातील ५० ते ६० मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लेदर बंदी, ट्रॅक्टरच्या पुढील भागावर कोणीही नाचणार नाही, सर्व मांडव रात्री १२ वाजता बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सकाळच्या सत्रात मिरवणूक काढणाऱ्यांना परवानगी असेल; मात्र दुपारी २ नंतर मुख्य मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. आगमन मिरवणूक संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल, असेही कळविण्यात आले.
राजारामपुरी गणेश आगमन मिरवणुकीसाठी पोलिसांची बैठक
|