बातम्या
मोरेवाडीतील गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांची धाड – 87 हजारांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 9/24/2025 3:11:02 PM
Share This News:
मोरेवाडीतील गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांची धाड – 87 हजारांचा मुद्देमाल जप्त
राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई; चार आरोपींवर गुन्हा
राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोरेवाडी नाका परिसरातील कंजारभाट वसाहतीत बेकायदेशीर गावठी दारू भट्ट्यांवर धाड टाकून तब्बल ₹87,200 किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला.
ही कारवाई बुधवारी सकाळी 11.20 वाजता गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. प्रकाश जॅकसन बागडे, चरण विरसिंग बागडे, शक्ती क्रांती माटुंगे आणि विजय जॅकसन बागडे (सर्व रा. कंजारभाट वसाहत) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चु व उपविभागीय अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पो.हे.कॉ. कृष्णात पाटील, पो.कॉ. संदीप सावंत, सत्यजीत सावंत, विशाल शिरगावकर आदींसह होमगार्डनी सहभाग घेतला. राजारामपुरी पोलिसांनी अशा अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.
मोरेवाडीतील गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांची धाड – 87 हजारांचा मुद्देमाल जप्त
|