बातम्या

इचलकरंजीत मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई!

Police take action in Ichalkaranji at midnight


By nisha patil - 10/27/2025 5:56:18 PM
Share This News:



इचलकरंजीत मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई! 

माजी नगरसेवकासह ११ जण जुगार खेळताना अटकेत – पाच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्यरात्री छापा टाकून ११ जणांना पकडले. या कारवाईत तब्बल ₹५,५६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 

या प्रकरणात माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड मनोज किसन साळुंखे याच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साळुंखेवर याआधी खून, खंडणी, आणि खुनाचा प्रयत्न अशा १८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी या छाप्यात रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


इचलकरंजीत मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई!
Total Views: 62