बातम्या
पोलिओविरुद्ध लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे : पालकमंत्री नितेश राणे
By nisha patil - 6/28/2026 10:29:03 PM
Share This News:
पोलिओविरुद्ध लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग ✒️गवस शुभम : राष्ट्रीय पल्स पोलिओ दिनानिमित्त कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सईद धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, "प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे ही केवळ जबाबदारी नसून निरोगी आणि सशक्त भारत घडविण्यासाठीचे महत्त्वाचे योगदान आहे. पोलिओविरुद्धची लढाई ही केवळ शासनाची नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे."
पोलिओमुक्त भारताचे यश अबाधित राखण्यासाठी जनजागृती, नियमित लसीकरण आणि प्रत्येक बालकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक बालक निरोगी राहिल्यास देशाचे भविष्य अधिक सक्षम, सुरक्षित आणि उज्ज्वल बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्हाभरातील विविध केंद्रांवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येत असून पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले
पोलिओविरुद्ध लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे : पालकमंत्री नितेश राणे
|