कागलमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्रवादी–छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती
By nisha patil - 11/17/2025 4:47:23 PM
Share This News:
कागलमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्रवादी–छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती
कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीने अनपेक्षितपणे युती केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मते, ही आघाडी केवळ कागल शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी व अनावश्यक संघर्ष थांबवण्यासाठी झाली आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागल्याबद्दल माफी मागितली. युतीमुळे कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मंगळवार दि. १८ रोजी मटकरी हॉलमध्ये मंत्री मुश्रीफ व समरजीतसिंह घाटगे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करतील. कागल तालुका इतिहासात पहिल्यांदाच अशी युती झाल्याचे त्यांनी सांगितले.
कागलमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्रवादी–छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती
|