बातम्या

पन्हाळा नगरपरिषद निवडणूक : नऊ नामनिर्देशन अर्ज दाखल, नगराध्यक्ष पद निरंक

Political news panhala


By nisha patil - 11/14/2025 10:28:41 PM
Share This News:



पन्हाळा नगरपरिषद निवडणूक : नऊ नामनिर्देशन अर्ज दाखल, नगराध्यक्ष पद निरंक

पन्हाळा नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी आज नऊ सदस्य पदांचे अर्ज दाखल झाले. तर नगराध्यक्ष पदासाठी एकही नामनिर्देशन दाखल न झाल्याने ते निरंक राहिले. त्यामुळे अध्यक्ष बिनविरोध होण्याच्या चर्चेला वेग आला आहे.

जनसुराज्य पक्षात अध्यक्ष पदासाठी तीन इच्छुकांना फॉर्म भरण्यास सुचवले असून अंतिम उमेदवार ठरलेला नाही. विरोधात सो. वेदांतिका भोसले यांचे नाव चर्चेत आहे. अनेक नाराज इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सदस्य बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे.

 

आज दाखल झालेले प्रमुख अर्ज —

प्रभाग 1-ब : निखील पोवार

प्रभाग 4-ब : सूरज पाटील

प्रभाग 7 : प्रदीप गवळी, रशिदा मुजावर

प्रभाग 9-ब : असिफइकबाल मोकाशी, मुजावर मुनाफ

प्रभाग 10-अ : शबाना मुल्ला

प्रभाग 10-ब : शहाबाज मुजावर, शकिल मुतवल्ली

ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माधवी जाधव-शिदे व चेतनकुमार माळी यांनी दिली.


पन्हाळा नगरपरिषद निवडणूक : नऊ नामनिर्देशन अर्ज दाखल, नगराध्यक्ष पद निरंक
Total Views: 45