शैक्षणिक
राजकीय पक्षांनी संविधानानुसार देश चालवावा : डॉ.आर.डी.मांडणीकर
By nisha patil - 6/12/2025 2:03:08 PM
Share This News:
कोल्हापूर: भारतातील राजकीय पक्षांनी धर्मापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील मूल्यानुसार देश चालवावा असे आवाहन शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते प्रमुख व्यक्ते म्हणून बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राजकीय विचारांची प्रस्तुतता असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
डॉ. आर. डी. मांडणीकर म्हणाले, स्वातंत्र्य समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही भारतीय संविधानातील मूल्ये आहेत. या मूल्यावर लोकशाही आधारलेले असून यानुसार देश चालावा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते. केवळ मताचा अधिकार देऊन लोकशाही सक्षम होणार नाही तर सामाजिक आर्थिक समानता आली पाहिजे. सर्वांना न्यायाने वागवले पाहिजे.
डॉ. मांडणीकर म्हणाले,रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संविधान देणे गरजेचे होते. त्याऐवजी त्यांनी भगवत गीता भेट दिली. एखाद्या धर्मानुसार देश चालणे उपयोगाचे नाही तर संविधानानुसार देश चालला पाहिजे.आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची धर्मनिरपेक्षता यामुळे पुसटशी होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष खूप मोठा होता .शिक्षण समाजकारण राजकारण अर्थकारण या सर्व क्षेत्रात त्यांनी संघर्ष केला आणि यश मिळवले. त्या सर्वांची जाणीव ठेवून समाजाने अधिकाधिक ज्ञान संपन्न झाले पाहिजे. राजकीय व्यवस्थेत समानता आली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. विजय देठे यांनी केले. डॉ. शोभा चाळके-म्हमाने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले . डॉ. डी. के. वळवी, डॉ. पांडुरंग पाटील,डॉ. के.एम.देसाई, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते .
शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेवर ग्रंथ प्रदर्शन संपन्न झाले.
राजकीय पक्षांनी संविधानानुसार देश चालवावा : डॉ.आर.डी.मांडणीकर
|