बातम्या

नगरसेविका प्रा.पूनम लिचम यांनी केली कामांची पाहणी

Poonam licham


By nisha patil - 6/6/2026 11:31:41 AM
Share This News:



**नगरसेविका प्रा.पूनम लिचम यांनी केली कामांची पाहणी*

आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा नगरपंचायतीच्या हद्दीतील काही वर्षापासून रस्ते आणि गटारी पासून वंचित असलेल्या चाफेगल्लीतील रस्ते व गटारिंची कामे सद्या सुरु झालेली आहेत.

प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून या कामांची पूर्ती होत असून रस्ता व गटारीच्या कामाची पाहणी करण्याकरिता त्या प्रभागातील नगरसेविकाप्रा.पूनम लिचम यांनी ठेकेदार राजू हरमळकर यांच्या समवेत भेट देऊन कामाच्या दर्जाची पाहणी केली.

    यावेळी प्रा.पूनम लिचम यांनी ठेकेदाराला पावसाळा सुरु होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याबाबत सूचना दिली. त्याचप्रमाणे महादेव मंदिर समोरील गटर व रस्ता तातडीने करून घेण्याबाबत सांगितले. कारण पावसाळ्याअगोदर ही कामे पूर्ण होणे गरजेचे असून त्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास हाऊ नये यासाठी त्यांनी या कामाची पाहणी करून संबंधिताना काम वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. अंदाजे पंधरावर्षापासून रेंगाळलेले काम आता पूर्णत्वास येत असल्यामुळे चाफेगल्लीच्या नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात असलेबाबत बोलले जात आहे.


नगरसेविका प्रा.पूनम लिचम यांनी केली कामांची पाहणी
Total Views: 670