बातम्या

77 वर्षात जे जमले नाही ते आज युवकांनी करून दाखवले

Porolivadi


By nisha patil - 6/19/2026 11:46:18 AM
Share This News:



**77 वर्षात जे जमले नाही ते आज युवकांनी करून दाखवले

परोलीवाडी येथे बस सेवा सुरु*

आजरा(हसन तकीलदार)*:-युवाशक्ती म्हणजेच देशाची प्रेरणा शक्ती आहे. युवकांनी जर मनात आणले तर देशाची आणि समाजाची सकारात्मक परिस्थिती बदलू शकतात. याचाच प्रत्यय आजरा तालुक्यातील परोलीवाडी गावात आला.

स्वातंत्र्योत्तर 77वर्षे आजपर्यँत या गावात बस सेवा नव्हती परंतु आम. शिवाजीराव पाटील यांचे समर्थक आणि भाजपचे युवा नेते जयवंत सुतार,परोलीवाडीतील युवा नेतृत्व जयवंत सावंत आणि चाफवड्याचे माजी सरपंच विलास धडाम यांच्या प्रयत्नातून आजऱ्यातून परोलीवाडी येथे बस सेवा सुरु केली.

   आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जयवंत सावंत म्हणाले की, 77 वर्षानंतर गावात एस. टी. येणार होती. सर्वेसाठी अधिकारी आले. रस्त्याकडेची झुडपे आणि रस्त्याच्या साईडपट्ट्यावर पावसाळ्यात चिखल होणार त्यामुळे झुडपे, फांद्या मारून साईडपट्ट्या मध्ये खडी टाकण्यास अधिकाऱ्यांनी सूचना देताच वॉट्सअप ग्रुपवर मदतीचा एकच संदेश टाकला अन एका दिवसातच सगळे काम फत्ते झाले. वर्गणी पुरे म्हणायची वेळ आली असे त्यांनी सांगितले.77वर्षानंतर स्वप्नाला आकार आला आणि स्वप्न साकार करण्यात विजय सावंत, रोशन नेवरेकर, प्रकाश सावंत, महादेव दोरुगडे, महादेव नेवरेकर, अतिक नेवरेकर, प्रमोद भोसले, संभाजी नेवरेकर, संभाजी मोहिते आणि परगावी नोकरी करणाऱ्या तरुणांनी सढळ हातानी देणगी देऊन हातभार लावला. परोलीवाडी येथील वृद्ध रघुनाथ नेवरेकर म्हणाले की,आजपर्यँत आम्हाला आजऱ्याला जायला 200 ते 300 रुपये रिक्षाला मोजवे लागत होते. आता एस.टी. सुरु झाल्याने ते पैसे वाचले आणि शाळेच्या मुलांची, आजारी माणसांची व बाजारला जाणाऱ्या लोकांची चांगली सोय झाली असे म्हणत 2000/-रुपयांची देणगी युवकांना रोख दिली.

   एस टी सुरु करताना आम. शिवाजीराव पाटील यांची भाची सौ. भारतीताई जाधव (संयोजिका, चंदगड विधान सभा मतदार संघ ), युवा नेतृत्व जयवंत सुतार (भाजप ), ग्रामसेविका दीपाली राजगुरू तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वाहक व चालक यांचा सत्कार करून एस.टी. ची ओवाळणी करून श्रीफळ वाढवण्यात आला.


77 वर्षात जे जमले नाही ते आज युवकांनी करून दाखवले
Total Views: 1212