शैक्षणिक

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय – सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव

Positive decision on issues of non teaching staff

By nisha patil - 7/8/2025 5:41:10 PM
Share This News:

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय – सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव

कोल्हापूर, दि. ७ : प्रशासकीय शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन सेवक संघाच्यावतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांच्याशी चर्चा करण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या 12-24 लाभांसाठी ट्रेझरीमार्फत निधी लवकरच वितरित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन पगार पत्रक सादर करण्यास मंजुरी देण्यात आली असून, 10-20-30 योजना लवकरच लागू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या बैठकीस हितेंद्र साळुंखे, अनिल घाटगे, अशोक जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय – सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव
Total Views: 113