राजकीय

कोल्हापूरात आप–वंचित एकत्र येण्याची शक्यता?

Possibility of AAP Vanchit coming together in Kolhapur


By nisha patil - 12/26/2025 11:21:31 AM
Share This News:



कोल्हापूर:- कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड समोर येत असून, आम आदमी पार्टी (आप) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण सोनवणे आणि आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांच्यात याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता कोल्हापूरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असून, त्यात आप–वंचित युतीबाबत अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या पत्रकार परिषदेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या संभाव्य युतीमुळे कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता असून, तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.


कोल्हापूरात आप–वंचित एकत्र येण्याची शक्यता?
Total Views: 48