बातम्या

*वीज अधिकारी व कर्मचारी यांच्या तत्परसेवेमुळे विजपुरवठा सुरळीत

Power supply is smooth due


By Administrator - 8/7/2026 8:01:07 PM
Share This News:



*वीज अधिकारी व कर्मचारी यांच्या तत्परसेवेमुळे विजपुरवठा सुरळीत
 

*अवघ्या 4 तासात ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून बसवला
 

*आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे झाडे पडून विद्युत तारा तुटण्याचे प्रकार वाढलेले आहे. त्यामुळे विजकर्मचाऱ्यांच्यावर कामाचा ताण वाढतच आहे. ठेकेदारांचे कंत्राटी कर्मचारी आपली प्रामाणिक सेवा बजावत आहेत.
         

दि. 8/7/2026 रोजी सकाळी 11:00 वाजता आजरा शहरातील आजरा पेट्रोल पंपाशेजारील पोलीस स्टेशनच्या बाजूचे ट्रान्सफॉर्मर अचानक नादुरुस्त झाल्यामुळे आजरा पोलीस ठाणे, नाईक गल्ली, आंबोली रोड, एकता कॉलनी आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
   

ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर बिघाड झलेल्या ट्रान्सफॉर्मरला काढून गडहिंग्लज येथे दुरुस्तीला पाठवून गडहिंग्लज येथून दुरुस्त करून आणावा लागतो व त्यानंतर तो बसवावा लागतो. या कामाला अंदाजे पूर्ण दिवस जातो. आणि संपूर्ण दिवस वीज ग्राहकांना वीज पुरवठेविना ताटकळत बसावे लागते परंतु आजरा 1 चे शाखा अभियंता कृष्णा कोळी, लाईनमन संतोष डोंगरे,यश वर्धनचे ठेकेदार किरण पाटील आणि त्यांचे कंत्राटी कर्मचारी यांच्या सहकार्याने सदरचे काम अवघ्या 4 तासात पूर्ण करून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. त्यांच्या या तत्पर सेवेचे कौतुक होताना दिसत आहे. या कामात कार्यतत्पर कार्यकारी अभियंता संजय पोवार यांचेही मोलाचे योगदान लाभले.


*वीज अधिकारी व कर्मचारी यांच्या तत्परसेवेमुळे विजपुरवठा सुरळीत
Total Views: 26