विशेष बातम्या
प्राडाची टीम कोल्हापुरात.. कोल्हापुरी चप्पल कारागिरांची भेट
By nisha patil - 7/15/2025 9:02:20 PM
Share This News:
प्राडाची टीम कोल्हापुरात.. कोल्हापुरी चप्पल कारागिरांची भेट
इटलीतील प्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडाची टेक्निकल टीम आज कोल्हापूरात दाखल झालीय.
इटलीवरून आलेल्या प्राडाच्या या टीमने कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी प्राडाने कोल्हापुरी चप्पलचे मॉडेल कॉपी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर प्राडाने थेट कोल्हापुरी चप्पल कारागिरांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य लाभत असून, यामुळे कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोल्हापुरी चप्पल ही आपल्या पारंपरिक ओळखीचा भाग असून, प्राडासारख्या जागतिक ब्रँडने याला हातभार लावल्यामुळे स्थानिक कारागिरांना नवसंजीवनी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्राडाची टीम कोल्हापुरात.. कोल्हापुरी चप्पल कारागिरांची भेट
|