शैक्षणिक

विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटाराव हायस्कुलचे उज्वल यश

Pradnyshodha exam


By nisha patil - 12/28/2025 11:27:57 PM
Share This News:



विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटाराव हायस्कुलचे उज्वल यश

आजरा (हसन तकीलदार ):-डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा 2025- 26 अंतर्गत  व्यंकटराव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता सहावी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल सुयश संपादन केले. 

यामध्ये कामत आर्णवी श्रीकांत,देसाई राजवर्धन रणजीत,पाटील अद्वैत महादेव, पाटील आदित्य मनोज 

इयत्ता नववीचे प्रज्ञापत्र विद्यार्थी..

 गिरी आयुष ओमकार,चौगुले सानवी लक्ष्मण, जाधव राजवीर सुरज,तेजम संस्कार संजय,सय्यद हाजीक मोहम्मद इरफान,पाटील विवेक धनाजी,पुंडपळ सौश्रुती अमित,निंबाळकर स्वराज प्रवीण

वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले व इयत्ता सहावी साठी सौ.व्ही.ए.वडवळेकर व नववीसाठी एम.एम.यलगार यांचे मार्गदर्शन लाभले.


विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटाराव हायस्कुलचे उज्वल यश
Total Views: 288