शैक्षणिक
आजरा महाविद्यालयातील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता चौगुले तर निबंध स्पर्धेत रसिका सुपल प्रथम
By nisha patil - 4/10/2025 2:30:43 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार) :- आजरा महाविद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता चौगुले तर निबंध स्पर्धेत रसिका सुपल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अण्णाभाऊ स्मृती पंधरवडानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेसाठी २३ तर वक्तृत्व स्पर्धेसाठी १७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे व संचालक विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत सौ.व्ही.एस.देसाई यांनी केले. प्रास्ताविक उपप्रचार्य डी.पी. संकपाळ यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.आर. आर. पवार तर आभार श्रीमती एस. आर.माने यांनी मानले.सौ. भारती कांबळे व सौ. अंजना कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.आप्पासाहेब बुडके,वृषाली केळकर व आदेश दळवी तर निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ.एस. आर.माने, सौ.व्ही. एम. देसाई, श्रीमती एस. आर. पारकर यांनी काम पाहिले.स्पर्धेमध्ये तालुक्यातील १३ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम - प्राजक्ता नामदेव चौगुले, द्वितीय - आदिती सुजय चव्हाण, तृतीय - ज्योती परसू नाईक तर उत्तेजनार्थ ओवी विशाल रेळेकर यांनी क्रमांक मिळविला तर निबंध स्पर्धेत प्रथम - रसिका विठोबा सुपल, द्वितीय - अमृता विजय करंबळी, तृतीय - प्रियांका युवराज सुतार तर उत्तेजनार्थ सानिका सोनबा पारपोलकर यांना मिळाला. सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे, उपप्राचार्य डी.पी. संकपाळ, अधीक्षक योगेश पाटील, पर्यवेक्षक एम. एस. पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व शाळांना स्मृतीचिन्ह व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक विनायक चव्हाण यांनी केले.स्पर्धेचे नियोजन सौ. वाय.टी.भोकरे यांनी केले. सूत्रसंचालन व्ही.एम.देसाई यांनी केले. आभार सौ.एस. एस. कुलकर्णी यांनी मानले. वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.
आजरा महाविद्यालयातील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता चौगुले तर निबंध स्पर्धेत रसिका सुपल प्रथम
|