बातम्या
ना. प्रकाश आबिटकर : 'छत्रपतींच्या आदर्शावरच जीवनाची वाटचाल हवी'
By nisha patil - 4/29/2025 5:19:45 PM
Share This News:
ना. प्रकाश आबिटकर : 'छत्रपतींच्या आदर्शावरच जीवनाची वाटचाल हवी'
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांना शिवतीर्थावर नविन रूप
आजरा शहरातील शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण समारंभ ना. प्रकाश आबिटकर आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना ना.प्रकाश आबिटकर म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचा, समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश देत रयतेचे राज्य उभारले. ते सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचाराने व आदर्शावर जीवनात वाटचाल करूया. हा क्षण आनंदाचा असून त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा आहे.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, माजी आमदार के.पी.पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, आण्णाभाऊ उद्योग समुहाचे प्रमुख अशोकआण्णा चराटी, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, यांच्यासह पुतळा सुशोभीकरण समितीचे पदाधिकारी, विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. प्रकाश आबिटकर : 'छत्रपतींच्या आदर्शावरच जीवनाची वाटचाल हवी'
|