बातम्या
आजरा शहरात उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी प्रकाश आबिटकर यांनी मंजूर केला
By nisha patil - 9/30/2025 12:16:29 PM
Share This News:
आजरा शहरात उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी प्रकाश आबिटकर यांनी मंजूर केला
*आजरा (हसन तकीलदार)*:-राज्य शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात “नमो उद्यान” उभारण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील रहिवाशांना आधुनिक व आकर्षक उद्यानाचा लाभ मिळणार असून हरित परिसर आणि दर्जेदार विरंगुळ्याच्या सोयी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना उत्कृष्ट दर्जाचे उद्यान विकसित करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे. त्याअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यात यावे, यासाठी आपला पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार या पाठपुराव्याला यश येत नमो उद्यानाला मंजुरी मिळाली आहे. या नमो उद्यानात मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग, तसेच आकर्षक बागा व फवारे बसविण्यात येणार आहेत.
त्यामुळे आजरा शहरातील नागरिकांना दर्जेदार उद्यान, हरित परिसर आणि विश्रांतीसाठी तसेच फिरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत. आजरा शहरातील नागरिकांसाठी हरित वातावरण, आरोग्यदायी जीवनशैली व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प नक्कीच महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आजरा शहरात उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी प्रकाश आबिटकर यांनी मंजूर केला
|