बातम्या

नागपंचमी व उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोबा मंदिरात प्रसाद वाटपाचा उपक्रम

Prasad distribution initiative at Nagoba

By nisha patil - 7/29/2025 9:20:12 PM
Share This News:

नागपंचमी व उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोबा मंदिरात प्रसाद वाटपाचा उपक्रम

नागपंचमी तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोबा मंदिर, सायबर रोडजवळ येथे शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रसाद वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.

शिवसेनेचे ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ हे धोरण लक्षात घेऊन जागृती नगर, दौलत नगर, प्रतिभा नगर, अंबाबाई डिफेन्स आणि इतर भागातील नागरिकांसाठी प्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा मोठ्या संख्येने भक्तांनी लाभ घेतला.

कार्यक्रमावेळी उपनेते  संजय पवार, जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, रूपाली घोरपडे, आसावरी सुतार, पल्लवी चिखलीकर, वर्षा पाटील, जयश्री, संगीता, माला, स्वाती सांगावकर तसेच शिवसेना महिला आघाडीच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
नागपंचमी व उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोबा मंदिरात प्रसाद वाटपाचा उपक्रम
Total Views: 58