बातम्या
प्रशांत नाकवे यांचे उद्या व्याख्यान
By nisha patil - 11/15/2025 5:28:04 PM
Share This News:
प्रशांत नाकवे यांचे उद्या व्याख्यान
कोल्हापूर ः प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन विभाग आणि युनाते क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 16 रोजी सायंकाळी 4 वा. शाहू स्मारक भवनात मिड डे, टाईम्स ऑफ इंडिया आणि द हिंदू आदी प्रतिष्ठित दैनिकात काम केलेले मुंबईतील ख्यातनाम फोटो जर्नालिस्ट प्रशांत नाकवे यांचे ‘फोटो जर्नालिझम आणि एआयचे आव्हान’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.
यावेळी रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज दरेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार रघू जाधव, अस्मिता जाधव, छायापत्रकार राहुल गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नाकवे यांनी संपूर्ण एआय तंत्रज्ञान वापरुन तयार केलेल्या शॉर्टफिल्मचेही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि शुभम चेचर यांनी केले आहे.A
प्रशांत नाकवे यांचे उद्या व्याख्यान
|