विशेष बातम्या
प्रतिज्ञा उपक्रमाची 3000 वी मैफिल गुरुवारी
By nisha patil - 8/18/2025 5:25:00 PM
Share This News:
प्रतिज्ञा उपक्रमाची 3000 वी मैफिल गुरुवारी
गोविंदराव टेंबे रंगमंदिरात संगीतप्रेमींसाठी विशेष आयोजन
कोल्हापूर : मानवतेसाठी गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाची 3000 वी मैफिल गुरुवार, दि. 21 रोजी सायंकाळी 6.30 वा. गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या विशेष मैफिलीत मराठी चित्रपटगीतं व भावगीतांचे सादरीकरण होणार असून अभय देशपांडे, सूर्यकांत पाटील, अमरसिंह राजपूत, डॉ. अतुल तोरो यांच्यासह अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. अश्विनी टेंबे आणि जयश्री देसाई निवेदन करणार आहेत.
गरजवंतांसाठी निधी संकलनाचे उद्दिष्ट ठेवून आयोजित या मैफिलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून प्रवेशासाठी ऐच्छिक शुल्क ठेवण्यात आले आहे. संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिज्ञा उपक्रमाची 3000 वी मैफिल गुरुवारी
|