बातम्या

प्रतिक गवारीचा अचूक लक्षवेध  ;  वालावलकर हायस्कूलला रौप्यपदक ; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Pratik Gavari hits the mark with precision


By nisha patil - 10/26/2026 1:49:13 PM
Share This News:



प्रतिक गवारीचा अचूक लक्षवेध  ;  वालावलकर हायस्कूलला रौप्यपदक ; विभागीय स्पर्धेसाठी निवड
 

कोल्हापूर :  आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांताराम पंत वालावलकर हायस्कूल मधील प्रतीक भोरू गवारी याने १४ वर्षे वयोगटातील मनपा जिल्हास्तरीय नेमबाजी या क्रीडा स्पर्धेमध्ये 10 मीटर पीप्स साईट रायफल प्रकारात द्वितीय क्रमांक संपादून रौप्यपदक प्राप्त केले .त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
     

या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक  राजेंद्र बनसोडे, क्रीडा प्रमुख  समीर जमादार,  सागर वाडकर तसेच प्रशिक्षक समीर मुल्लाणी यांचे मार्गदर्शन लाभले आणि वालावलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे,  पर्यवेक्षिका सरिता शिंदे तसेच शालेय समितीचे चेअरमन संजीवभाई परीख माजी सचिव आणि ज्येष्ठ संचालक एम.एस. पाटोळे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले


प्रतिक गवारीचा अचूक लक्षवेध  ;  वालावलकर हायस्कूलला रौप्यपदक ; विभागीय स्पर्धेसाठी निवड
Total Views: 12