बातम्या
किसरुळ येथील गर्भवती महिलेचे बोटीद्वारे यशस्वी स्थलांतर
By nisha patil - 8/20/2025 3:02:52 PM
Share This News:
किसरुळ येथील गर्भवती महिलेचे बोटीद्वारे यशस्वी स्थलांतर
प्रतिनिधी : शहाबाज मुजावर पुरपरिस्थितीमुळे वेढ्यात अडकलेल्या किसरुळ येथील गर्भवती महिला सोनाली नागेश केरबा कांबळे यांचे किसरुळ येथून प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार भोगाव येथे बोटीद्वारे यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आले.

या कार्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक कोल्हापूर, पी.आय. रणजित पाटील, बाजार भोगाव येथील , ग्राम महसूल अधिकारी म्हसवेकर, चौगले, मुल्ला, ग्रामपंचायत अधिकारी बाजार भोगाव चव्हाण , महसूल सेवक गुरव, महसूल सेवक संभाजी कुंभार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार भोगाव येथील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गर्भवती महिलेचे सुरक्षित स्थलांतर झाल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
किसरुळ येथील गर्भवती महिलेचे बोटीद्वारे यशस्वी स्थलांतर
|